ताडोबा संपूर्ण माहिती मराठी tadoba andhari national park 1

ताडोबा tadoba अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आणि पर्यटकांच्या आवडीचा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1994-95 मध्ये अस्तित्वात आला. आदिवासींचे दैवत तारू आणि जंगलातून वाहणारी नदी अंधारी यावरून या प्रकल्पाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे नाव पडले. हा प्रकल्प भारतातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्याघ्र प्रकल्प आहे. व्याघ्र प्रकल्पात आपण वाघाला पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता. वाघ या जंगलाच्या राजाला खुल्या नैसर्गिक अधिवासात पाहणे ही येथील पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्य आहे. येथील खुल्या जीपमधून होणारी सफारी ही कारणामुळे प्रसिद्ध आहे.

tadoba ताडोबा

ताडोबा tadoba येथे कसे जाल ?

१. बसने :

येथे जाण्यासाठी चंद्रपूर तसेच नागपूर येथून बसेस उपलब्ध आहेत . चंद्रपूर पासून ४५ किमी अंतरावर आहे . तसेच नागपूर वरून अंतर १४० किमी इतके आहे .

2. रेल्वे ने :

जवळचे रेल्वे स्टेशन हे चंद्रपूर आहे , जे ४५ किमी अंतरावर आहे . रेल्वे स्थानक गाठल्यानंतर आपण बस अथवा कॅब करून प्रवास करू शकता . तसेच नागपूर रेल्वे स्टेशन वरून  १५० किमी अंतरावर आहे . नागपूर रेल्वे स्थानकाजवळ तुम्हाला येथे जाण्यासाठी कॅब उपलब्ध होतात .

3. विमानाने :

जर तुम्ही विमानाने येणार असाल तर जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे . नागपूर विमानतळापासून येथे जाण्यासाठी कॅब आणि बस उपलब्ध आहेत . फक्त तुम्ही जर विमानाने येणार असल्यास सकाळी लवकर पोहोचेल अशी फ्लाईट घ्यावी , जेणेकरून त्याच दिवशीची दुपारची जंगल सफारी तुम्हाला करता येईल .

ताडोबा tadoba व्याघ्र प्रकल्प इतिहास

या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात प्राचीन काळात गोंड आदिवासी लोक राहायचे, गोंड राजाची या ठिकाणी सत्ता होती. तेव्हा “तारू” नावाचा एक गोंड आदिवासी तरुण या गावाचा प्रमुख होता. गावाच्या तलावाजवळ त्याची एका वाघासोबत लढाई झाली तेव्हा तारूने गावाच्या संरक्षणासाठी त्या वाघाचा सामना केला आणि त्यामध्ये तारूचा विजय झाला. तारूचा विजय जरी झाला असला तरी तू गंभीर जखमी झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्याच स्मरणार्थ तलावाजवळ एक मंदिर बांधले गेले.

tadoba ताडोबा

त्याच्या नावावरूनच नंतर जंगलाचे नाव तारू झाले यालाच “तारूबा” असे म्हटले जायचे मग ब्रिटिशांनी त्या नावाचा अपभ्रंश केला आणि त्याचं नाव “ताडोबा” असे झाले. ब्रिटिशांना या ठिकाणची लाकूड हवे होते म्हणून त्यांनी 1879 साली हे जंगल राखीव वन म्हणून घोषित केलं. 1955 साली हे जंगल संरक्षित वन असल्याचे जाहीर करण्यात आलं आणि त्याचे रूपांतर राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली.

ताडोबा tadoba विषयी प्रमुख माहिती

व्याघ्र प्रकल्प हा चार संरक्षित क्षेत्रात बफर झोन मध्ये विभागला गेला आहे. त्यातील कोअर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप पूर्णतः बंद असतो. 2010 साली कोअर क्षेत्राच्या बाहेर 1100 चौरस किलोमीटर परिसर हा बफर क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. या परिसरातील मानवी वस्त्यांचे स्थलांतर केले जाते कारण प्राण्यांना कोर क्षेत्र आणि त्या पलीकडचा बफर क्षेत्र ह्या गोष्टी कळत नाहीत.

अंधारी नदीला जीवन वाहिनी म्हणजेच लाईफ लाईन ऑफ tadoba असे म्हटले जाते .खातोडा गेट जवळ या नदीचे उगम स्थान आहे .ही नदी मोहर्ली को मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे वाघ व अन्य जीव प्राण्यांना संजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील मुख्य पाण्याचे स्त्रोत आहे.

वाघ ताडोबाचे प्रमुख आकर्षण

tadoba ताडोबा

पट्टेरी वाघ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. ताडोबा मध्ये 100 पेक्षा जास्त वाघ आहेत. निसर्ग साखळीत वाघाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वाघ ही प्रजाती “अम्ब्रेला स्पेसिस” म्हणून ओळखली जाते. वाघाच्या संरक्षणामुळे अप्रत्यक्षपणे इतर प्रजातींचे संरक्षण होते आणि पर्यावरणाच्या साखळीचा समतोल राखला जातो. ‘ताडोबा म्हणजे हमखास वाघाचे दर्शन’ असे समीकरण झाले आहे त्यामुळेच जगभरातील पर्यटकांचा ओघा असतो. त्यामुळेच  एक बुकिंग करण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागते. तसेच टूर गाईड , जिप्सी आणि बसेस जंगल सफारीसाठी उपलब्ध आहेत. येथील जंगल हे वाघांसाठी सर्वोत्तम प्रजनन केंद्र म्हणून ओळखले जाते .

वन्यप्राणी यांचे वैविध्य :

वाघा बरोबरच बिबट्या , अस्वल , तरस , नीलगाय , रानगवे या प्राण्यांचे 260 पेक्षा अधिक प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन आपल्याला या अभयारण्यात दिसून येते. तसेच साग , बांबू, तेंदू , खैर , मोह अशा विविध वृक्षांच्या दाटीने लुटलेले जंगल प्रत्येकाला निसर्गाचे एक वेगळे अनुभूती देते. इथल्या इराई धरणाच्या जलाशयाच्या कडेने विस्तीर्ण गवताळ भाग आणि दलदलीचा भाग आहे. त्या ठिकाणी मगरी , सुसर आणि जल पक्षी यांचा वावर आहे. उन्हाळ्यामध्ये पानगळ सुरू होताच जंगलात पळसाची गडद नारंगी फुले उठून दिसू लागतात.

tadoba ताडोबा

भेट देण्याची सर्वोत्तम वेळ :

भेट देण्यासाठी 1 ऑक्टोंबर ते 15 जून हा उत्तम काळ आहे.या वेळेत जंगल हिरवेगार झालेले असते आणि फुलांनी भरलेले असते . मात्र वाघप्रेमींनी मार्च ते जून दरम्यान भेट दिल्यास तुम्हाला सहजपणे वाघ व इतर प्राण्यांचे दर्शन घेऊ शकता .

ताडोबा सफारी बुकिंग :

पर्यटक येथील कोअर व बफर क्षेत्रासाठी १२० दिवस अगोदर बुकिंग करू शकतात . MyTadoba.org हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प , वन विभाग , महाराष्ट्र शासनचे अधिकृत संकेतस्थळ आहे . तुम्ही या वेबसाईट वर online बुकिंग करू शकता . अन्य संकेतस्थळ वरून फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत . त्यामुळे याच वेबसाईट चा बुकिंग साठी वापर करा . सकाळी ६ आणि दुपारी 2.३० वाजता अशा दोन वेळा जंगल सफारी असते . सफारी फी ही गाईड , जिप्सी एन्ट्री फी तसेच तुम्ही कधी बुकिंग करता यावर अवलंबून आहे . साधारणपणे ४५०० ते १२००० पर्यंत खर्च सफारी साठी होऊ शकतो .

tadoba ताडोबा

राहण्याची व्यवस्था :

१.मोहर्ली येथे MTDC चे पर्यटन संकुल आहे , तिथे तुम्ही बुकिंग करून राहू शकता . बुकिंगसाठी https://www.mtdc.co/en/stays या वेबसाईट वर जावे .

2. मोहर्ली तसेच कोलारा येथे वन विभागाचे निसर्ग पर्यटन संकुल आहेत .तिथेही राहण्याची व्यवस्था चांगली आहे .

3. मोहर्ली तसेच कोलारा येथे खाजगी पर्यटक resorts in tadoba देखील उपलब्ध आहेत .

१.सावसरा जंगल लॉज
2.टायगर रिसॉर्ट

FAQ :

१. ताडोबा मध्ये सध्या वाघ किती आहेत ?

कोअर व बफर झोन मध्ये एकूण वाघ १०० पेक्षा अधिक आहेत .

2. ताडोबात खाजगी गाडीला परवानगी आहे का ?

जर तुम्ही चारचाकी खाजगी वाहनाने जात असाल तर तुम्हाला परवानगी बफर झोन मध्ये दिली जाते .

3. ताडोबामध्ये प्रवेश करण्यासाठी किती गेट आहेत ?

एकूण कोअर झोनमध्ये जाण्यासाठी ६ गेट आहेत तर बफर झोनमध्ये जाण्यासाठी १६ गेट आहेत . त्यापैकी मोहर्ली गेट हा सर्वात गर्दीचा व जुने गेट आहे .तसेच कोलारा गेट देखील सफारीसाठी प्रसिद्ध आहे .

 

 

 

Leave a Comment