वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा अविष्कारच आहे . त्यातच मार्लेश्वर मंदिर Marleshwar म्हणजे नागमोडी पर्वतरांगा जणू निसर्ग सागरावर उमटणा-या सोनेरी लाटाच .सह्याद्री पर्वतरागांच्या एका कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचं श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे.या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात अध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योग साधकास अध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.
रत्नागिरी जिल्हय़ातील हे प्रसिद्ध ठिकाण देवरूखपासून २० किमी , साखरपापासून ३० किमी तर रत्नागिरीपासून ६० किलोमीटरवर आहे . शंकराचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थळी भाविकांची नेहमी वर्दळ असते. मार्लेश्वरचे हे स्थळ म्हणजे एक गुहा असून, या गुहेच्या पाठीमागे तो प्रचंड धबधबा दरीमध्ये कोसळतो. मुख्य धबधब्याशिवाय भोवतीच्या डोंगरांमधून असंख्य जलधारा वाहात असतात. या साऱ्या पुढे मुख्य जलधारेस येऊन मिळतात. धबधब्याचा भोवतीचा भाग निसरडा असल्याने कठडे लावत तो सुरक्षित केलेला आहे. पण केवळ दर्शन झाले तरी मार्लेश्वरचा हा धबधबा आणि त्याभोवतीचा निसर्ग मन प्रसन्न करतो.
मार्लेश्वर मंदिर Marleshwar
संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख शहरापासून सुमारे १५ कि. मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेलं हे पवित्र आणि जागृत देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिकदृष्ट्या अतिशय विलोभनीय असणा-या या ठिकाणी माणूस अक्षरश: भान हरपतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधून वाहणारी बाव नदी त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे आवाज प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते.
Marleshwar ला कसे जाल ?
१.रत्नागिरी हून –
मार्लेश्वर मंदिर Marleshwar हे रत्नागिरी शहरापासून ६० किमी अंतरावर आहे .रत्नागिरी हून मार्लेश्वर ला पोहोचायला दीड तास लागतो. रत्नागिरी शहरापासून ST बसेस उपलब्ध आहेत तसेच खाजगी प्रवासी वाहनाद्वारे तुम्ही मार्लेश्वर ला जाऊ शकता .
रत्नागिरी – हातखंबा – बावनदी – देवरुख – मारळ- मार्लेश्वर
2. कोल्हापूर मधून
मार्लेश्वर ला कोल्हापूर मधून जायचे असेल तर तुम्ही आंबा घाट मधून मार्लेश्वर ला जाता येते . कोल्हापूर ते मार्लेश्वर हे अंतर ९३ किमी इतके आहे . कोल्हापूर हून मार्लेश्वर ला जाण्यासाठी 3 तास लागतात . सध्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्ता थोडा खराब आहे . आंबा घाट उतरून कळकदरा बसथांबा येथून उजवीकडे मार्लेश्वर वळावे लागते . राष्ट्रीय महामार्गापासून मार्लेश्वर अंतर २० किमी आहे , परंतु पावसामुळे रस्त्यावर खूप खड्डे असल्याने १ तास वेळ पोहोचायला लागतो .
3. मुंबई हून मार्लेश्वर ला कसे पोहोचाल
१. ट्रेन ने – मुंबई वरून मार्लेश्वर ला यायचे असेल तर ट्रेन ने पोहोचता येते . मार्लेश्वर नजीक दोन रेल्वे स्टेशन आहेत , १. संगमेश्वर रोड 2. रत्नागिरी . परंतु सर्व रेल्वे ह्या रत्नागिरी येथे थांबत असल्याने मुंबई हून रत्नागिरी ला ट्रेन ने प्रवास करणे सोयीस्कर आहे . त्यानंतर रत्नागिरी येथून बस अथवा खाजगी प्रवासी वाहनाने मार्लेश्वर ला पोहोचता येते
2. खाजगी वाहनाने – मुंबई ते मार्लेश्वर हे अंतर ३३० किमी आहे . सध्या मुंबई गोवा महामार्ग चे काम सुरु असल्याने तसेच खूप खड्डे असल्याने ८ ते ९ तास वेळ लागतो . त्यामुळे सायन पनवेल एक्स्प्रेस वे आणि नंतर मुंबई पुणे हायवे ने खालापूर पर्यंत येऊन तिथून पुढे खालापूर पाली ते पाटणसाई रोड ने गेल्यास रस्ता चांगला आहे . तिथून गोवा महामार्गाने संगमेश्वर पुढे बावनदी पर्यंत प्रवास करून तिथून ४० किमी अंतरावर मार्लेश्वर आहे . मुंबई गोवा महामार्गापासून मार्लेश्वर १ तास अंतरावर आहे .
मार्लेश्वर इतिहास व आख्यायिका
मारळ गावाचे दैवत म्हणून या स्थानास मार्लेश्वर या नावाने ओळखले जाते. पूर्वी हे दैवत देवरुख येथे होते व त्याची स्थापना भगवान परशुराम यांनी केली होती. मात्र शिलाहार राजवटीस उतरती कळा लागल्यावर शत्रूंनी कोकणात अनाचार माजवला आणि खून, चकमकी, लुटालूट या सर्वांनी जनता त्रस्त झाली. देवरुख येथील शंकरास हे सारे असह्य झाल्याने त्याने मंदिर सोडून डोंगर दऱ्यात राहण्याचा निश्चय केला व तेथून त्याने सह्याद्रीच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रवास करीत असताना त्यास एक झोपडी दिसली व त्या झोपडीत शिवनामाचा जप करीत असलेला एक भाविक त्याच्या दृष्टीस पडला. भाविकाने शंकरास आपल्या झोपडीत घेतले मात्र मार्लेश्वराने त्यास सह्याद्रीतील गुहेचे स्थान विचारले व त्यानुसार भाविकाने शंकरास अंधारात सोबत देऊन दाट जंगलातील त्या गुहेच्या स्थानापर्यंत पोहोचते केले. देव नाहीसा झाल्याचे जेव्हा मूळ मंदिरातील पुजाऱ्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने ही माहिती गावकऱ्यांना सांगितली आणि सर्वांना दुःख झाले . त्याच रात्री पुजाऱ्यास स्वप्नात शंकराचा दृष्टांत झाला व या दृष्टांतात त्याने आपण माणसा माणसात वाढलेल्या दुराचारास कंटाळून अरण्यात वास्तव्य करीत आहोत असे सांगितले.
पुजाऱ्यास दृष्टांत झाल्यावर सर्व गावकऱ्यांनी देवाच्या शोधास प्रारंभ केला व जंगजंग पछाडले मात्र काही केल्या देव सापडेना मात्र देव गाव सोडून निघून गेल्यावर परिसरात रोगराई व परकीय आक्रमणे अशी संकटे उद्भवू लागली. मात्र पुढे परिसरातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन अन्यायाच्या विरोधात लढा उभारला आणि परकीय शत्रुंना कोकणातून पिटाळून लावले आणि ज्या ठिकाणी हा अभूतपूर्व संग्राम झाला अर्थात नागरिकांनी शत्रुंना ज्या ठिकाणी ‘मारलं’ ती जागा पुढे ‘मारळ’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
पुढे इसवी सन १८०० मध्ये आंगवलीचे सरदार आणेराव साळुंके शिकारीस सह्याद्रीतील जंगलात गेले असता त्यांना एक शिकार दृष्टीस पडली मात्र ती त्यांना पाहताच पळू लागली व साळुंके तिचा पाठलाग करू लागले. पळता पळता शिकार एका गुहेत शिरली व अचानक वरून एक दगड गुहेवर पडून गुहेचे दार बंद झाले. सरदाराने गुहेवरील दगड बाजूला सरल्यावर त्यांना समोर मार्लेश्वराचे दर्शन झाले. आणेराव साळुंके यांना ज्या दिवशी मार्लेश्वराचे दर्शन झाले तो दिवस मकर संक्रांतीचा असल्याने दर संक्रांतीला येथे खूप मोठा उत्सव भरतो. याचवेळी मार्लेश्वराचा विवाहसोहळा देखील साजरा केला जातो व साखरपा येथील गिरिजादेवीस पालखीतून वाजत गाजत मार्लेश्वरा विवाहासाठी आणले जाते. यावेळी इतर अनेक गावातून लोक त्या गावांच्या पालख्या घेऊन सोहळ्यास हजर राहतात .
प्रमुख आकर्षण :
१. धारेश्वर धबधबा
मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आहे. तीनही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे २०० फूट उंचीवरून पडणारा ‘धारेश्वर’ धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बावनदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. शुभ्र पाण्याचा प्रपात बघितला की असे वाटते जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूपं हे धडकी भरवणारं असतं. तेथे जवळ जवळ बाराही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरातून पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यात धारेश्वर धबधब्यात पर्यटकांना व भाविकांना उतरण्यास बंदी घातले जाते , पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून गेल्याचे घटना येथे अगोदर घडल्या आहे , तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे .
2. श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र
मार्लेश्वर येथील मंदिर हे निसर्गरम्य व तितकेच पुरातन मंदिर आहे . मंदिराचा गाभारा हा गुहा स्वरूपाचा असून त्याला साडेतीन फुटी प्रवेशद्वार आहे. या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच छोटीशी देवळी आहे . या देवळीतील गणेश मूर्तीचे प्रथम दर्शन घेऊन भाविक मार्लेश्वराचे दर्शन घेतात अशी प्रथा आहे. गुहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा दोन स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांना दर्शन होते . मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून, मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरांजनांचा मंद उजेड असतो. पावसाळ्यात मंदिरामध्ये काही ठिकाणी पावसाचे पाण्यानी मंदिर ओले झालेले असते . शिवापिंडाजवळ कपारी मध्ये साप तसेच नाग असल्याचे सांगितले जाते मात्र क्वचित प्रसंगी येथे साप दिसल्याचे समजते .
3. मार्लेश्वर चा जत्रा उत्सव
जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत दिवशी भरणारी यात्रा हा मार्लेश्वर देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो. ‘श्री मार्लेश्वर’ हा वर तर ‘गिरजाई’ देवीस वधू समजून लग्न लावले जाते. कोंडगाव-साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्री देवी गिरजाईची पालखी मार्लेश्वर येथे येते. हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावला जातो. मकरसंक्रांत यात्रा उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी हजेरी लावतात. संपूर्ण परिसरात ” हर हर महादेव ” व ” हर हर मार्लेश्वर ” चा जयघोष सुरु असतो .
FAQ
१. मार्लेश्वर ते गणपतीपुळे अंतर ganpatipule to marleshwar distance किती आहे ?
मार्लेश्वर ते गणपतीपुळे हे अंतर ७८ किमी आहे . मार्लेश्वर हून गणपतीपुळे येथे पोहोचण्यासाठी 2 तास वेळ लागतो .
2. मार्लेश्वर मंदिर परिसरात साप नाग marleshwar temple snakes आढळतात का ?
मार्लेश्वर परिसरात अनेक सापांचे अस्तित्व आहे व त्यांचे दर्शन होणे हे भाग्याचे मानले जाते मात्र गुहेत व बाहेर कोणाला सापांमुळे दंश झाल्याचे घटना घडलेली नाही .
3. कोल्हापूर ते मार्लेश्वर अंतर किती आहे kolhapur to marleshwar distance ?
कोल्हापूर ते मार्लेश्वर हे अंतर ९३ किमी इतके आहे . कोल्हापूर हून मार्लेश्वर ला जाण्यासाठी 3 तास लागतात . सध्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे काम सुरु असल्याने रस्ता थोडा खराब आहे . आंबा घाट उतरून कळकदरा बसथांबा येथून उजवीकडे मार्लेश्वर वळावे लागते . राष्ट्रीय महामार्गापासून मार्लेश्वर अंतर २० किमी आहे , परंतु पावसामुळे रस्त्यावर खूप खड्डे असल्याने १ तास वेळ पोहोचायला लागतो .
4. रत्नागिरी ते मार्लेश्वर हे अंतर किती आहे ratnagiri to marleshwar distance ?
मार्लेश्वर मंदिर Marleshwar हे रत्नागिरी शहरापासून ६० किमी अंतरावर आहे .रत्नागिरी हून मार्लेश्वर ला पोहोचायला दीड तास लागतो.
Very good initiative👌🏼 ….much needed information for tourists 🙏