पावसाळा म्हटलं की मुंबई पुण्याच्या लोकांची पावले आपोआप लोणावळा lonavala कडे वळू लागतात. अगदी शनिवार रविवारी तर हे प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण लोकांनी तुडुंब भरलेले असते. लोणावळा lonavala हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत पुणे जिल्ह्यात वसलेले आहे. पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे तसेच मुंबईपासून येथे येण्यासाठी लोकल रेल्वे उपलब्ध आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई चेन्नई हायवे याच शहरातून जातो.
लोणावळा चिक्की हा एक चवीने गोड असलेला लोणावळ्याचा सुप्रसिद्ध पदार्थ आहे.घाटमाथ्यावरील थंड हवेसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. विपुल वनराई हिरवागार निसर्ग, हिरवगार असलेले डोंगरमाथे व दऱ्या , पावसाळ्यात जागोजागी कोसळणारे धबधबे हे सर्व काही मनाला खूप सुखद वाटतं आणि त्यामुळेच पर्यटकांची येथे नेहमी गर्दी असते.
१. लोकल ट्रेन :
लोणावळा ला जाण्यासाठी मुंबई तसेच पुणे हून सर्वोत्तम पर्याय हा लोकल ट्रेनचा आहे .याच शहरांमध्ये रेल्वे स्थानक असून मुंबई-पुणे या रेल्वेमार्गाशी जोडले गेले असल्याने देशातून कोठूनही येथे येऊ शकतो. त्याच बरोबर मुंबई पुण्यातून लोकल रेल्वे सेवा ही सुरू आहे.
2. विमानाने :
लोणावळा पासून सर्वात जवळचे विमानतळ पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळ हे ६४ किमी अंतरावर आहे . पुणे विमानतळ भारतातील प्रमुख शहरांसोबत चांगले जोडले गेले आहे . विमानतळावरून लोणावळा येथे जाण्यासाठी तुम्ही कॅब घेऊ शकता.
3. कॅब / टॅक्सी :
लोणावळा येथे जाण्यासाठी पुणे तसेच मुंबईहून टॅक्सी आणि कॅब सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्ही ऑनलाइन देखील बुकिंग करू शकता. कॅब ने येथे पोहोचण्यासाठी पुणे हून दीड तास वेळ लागतो.
4. रस्त्याने :
पर्यटक स्वतः गाडी घेऊन येणे जास्त पसंत करतात , त्यामुळे वाटेत विविध ठिकाणे पाहता येतात पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई चेन्नई हायवे याच शहरातून जातो. अनेकदा सुट्टीच्या दिवशी ट्राफिक असल्यास 2 ते 3 तास वेळ पोहोचण्यासाठी लागतो .
५. बस द्वारे :
लोणावळा येथे बस स्थानक आहे . मुंबई आणि पुणे या ठिकाणांपासून तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसोबत बसद्वारे चांगली जोडलेले आहे. एसटी बसेस मुंबई तसेच पुण्याहून उपलब्ध आहेत. खाजगी बस चालकही मार्गावर बसेस चालवतात. प्रवासी त्यांच्या आवडीनुसार लक्झरी बसेस ,स्लीपर कोच निवडू शकतात.
भुशी धरण हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तरुणांपासून लहानग्यांपर्यंत सर्वच पर्यटक भुशी धरणावर बघायला मिळतात. भुशी धरण परिसर लोणावळ्यात भटकंती दरम्यान सर्वाधिक लोकप्रिय आणि विहंगम पर्यटन स्थळांपैकी एक असून सुंदर धबधबा हाकेच्या अंतरावरून वाहतो. इथे आल्यावर पर्यटकांचा थकवा पळून जातो. भुशी डॅमचे पाणी पायऱ्यांवरून वाहत खडकाळ भागावरून वाहताना पाहणाऱ्याचे मन वेधून घेते. किलबिलाट करणारे पक्षी, हिरवगार निसर्ग आणि आल्हाददायी धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडते. इंद्रायणी नदी तीरावर बांधण्यात आलेला भुशी डॅम लोणावळा आणि आयएनएस शिवाजीच्या डोंगराळ प्रदेशाच्या मागे उभा आहे. हे धरण मनोवेधक निसर्ग आणि डोंगराळ प्रदेशाने नटलेला आहे.
टायगर पॉइंट किंवा टायगर लीप हे ६५० मीटर डोंगर शिखरावर वसलेले, हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण. ढगांच्या दुलईत सामावलेले, प्रामुख्याने मान्सूनमध्ये हिरवेगार सौंदर्य लाभलेले निसर्गरम्य स्थळ आहे. स्थानिकांमध्ये ही जागा वाघदरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा आकार झेपावणाऱ्या वाघासारखा असल्याने हे नाव पडले आहे. इथला सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासारखा आणि मनाला शांती देणारा असतो. पर्यटन स्थळाजवळ लहानसा धबधबा असून तो पावसाळ्यात वाहतो. इथल्या धबधब्यांचा आणि चित्तवेधक दऱ्यांचा वेध घेण्यासाठी नजरेचे पारणे फेडणाऱ्या या टायगर लीपला नक्कीच भेट दिली पाहिजे.
ड्यूक्स नोज पॉइंटवरून खंडाळा घाटाचा काळजाचा ठेका चुकवणारा नजारा पाहायला मिळतो. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावावरून या जागेचे नाव पडले आहे. ड्यूक्स नोजला स्थानिक भाषेत नागफणी म्हणजे नागाचा फणा असे म्हणतात. ड्यूक्स नोज हे नयनरम्य ठिकाण, शांत वातावरण, सुंदर दऱ्या आणि हिरव्यागार वनराईसाठी प्रसिद्ध आहे. इथे शिखरावर असलेले शिव मंदिर सुप्रसिद्ध आहे , इथून सौंदर्याची मजा अनुभवता येते. लोणावळ्यातील हे लोकप्रिय ठिकाण ट्रेकिंग, हायकिंग आणि रॉक क्लायबिंगसाठी लोकप्रिय आहे.
4. पवना लेक :
पवना लेक हा कृत्रिम जलाशय असून कॅम्पिंगकरिता पर्यटकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे पर्यटक निसर्ग आणि आल्हाददायक हवामान इत्यादीची मजा लुटू शकतात. पवना लेकजवळ लोहगड तिकोना आणि विसापूर किल्ले आहेत . त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. या ठिकाणी नयनरम्य भटकंतीशिवाय, पर्यटकांना कॅनोइंग आणि नौकाविहाराचा पर्याय उपलब्ध आहे. पवना लेकला भेट देण्यासाठी पावसाळी ऋतू अगदी योग्य असून सगळीकडे हिरवाईचा आनंद लुटता येतो. इथे कॅम्पिंगला सर्वाधिक पसंती देण्यात येते. काही टूर ऑपरेटर पवना सरोवराजवळ कॅम्पिंग पॅकेजही उपलब्ध करून देतात. इथला शांत परिसर आणि निसर्गरम्य परिसर , सोबत मित्र परिवार आणि शांतता आपल्याला वेगळीच अनुभूती देते .
५. कार्ले आणि भाजे लेणी
या लेण्या पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन लेण्या असल्याचं देखील सांगण्यात येतं. भाजे लेण्यातील चैत्यगृह अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण आहे. हे एक प्रार्थनागृह असून या चैत्यागृहाला २७ खांब आहेत. या खांबांवर लाकडी तुळयांच्या सहाय्याने अप्रतिम छत तयार करण्यात आलंय. बौद्ध भिक्खूंनी साधारणतः २२०० वर्षांपूर्वी हे छत बनविले असल्याचं सांगण्यात येतं. साधारणतः २२०० वर्षांपूर्वी करण्यात आलेलं हे लाकूडकाम अजून देखील सुस्थितीत आहे. कार्ले आणि भाजे लेणी ह्या बौद्धकालीन शैलीतील दगडी गुंफा इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील आहेत.
कार्ले ते भाजे लेणी हे अंतर सुमारे ८ किमी इतके आहे .कार्ले लेणी हे भारतामधील सर्वात मोठे हिनयान बौद्ध चैत्य (मंदिर) आहे, ज्याची उभारणी सातवाहनाच्या राजवटीत करण्यात आली. कार्ले लेणीचे चढण साधारण २० मिनिटांत पार होते. तीन हत्तींच्या भव्य कोरीवकाम असलेल्या सिंहासनावर बसलेले उपदेशक बुद्धाचे शिल्प आहे. भाजे गावापासून ४०० फूट उंचीवर वसलेली भाजे लेणी ही २२ दगडांत कोरलेल्या लेण्यांमधली एक वास्तुशिल्पीय चमत्कार आहे. या दगडांत कोरण्यात आलेल्या लेण्या, सोबत विहार, स्तूप आणि चैत्यांचा वापर वाटसरू आश्रय घेण्यासाठी होत असे.
६. राजमाची किल्ला
पावसाळ्यात सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या स्थळांमध्ये राजमाची किल्ल्याचा क्रमांक खूप वरचा आहे. प्रत्येक वेळी हा ट्रेक ट्रेकरच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणतो. राजमाची ट्रेक तुलनेन सोपी चढाई असून, मुंबई आणि लोणावळा या दोन्ही बाजूंनी तुम्ही चढाई करू शकता. इथे पाऊस भरपूर होत असल्यानं योग्य ती काळजी घेणं मात्र महत्त्वाचं आहे. इथे दोन गुहा असून तिथे ४० लोक राहू शकतात किंवा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळभैरव मंदिरात देखील तुम्ही राहू शकता. पहाटेच्या वेळचं निसर्गसौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल .
7. नारायणी धाम मंदिर :
लोणावळ्यात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले नारायणी धाम मंदिर हे सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण आहे. नारायणी धाम मंदिर २००२ मध्ये उभारण्यात आले आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार चार मजली असून मुख्य प्रवेशापासून देवळापर्यंतच्या मार्गावर कारंजे लावले आहेत. हे लोकप्रिय मंदिर 4.5 एकरहून अधिक विस्तृत परिसरात उभे आहे.मंदिर परिसरात अंत्यंत सुंदर बाग आहे .
९. कॅनियन व्हॅली :
कॅनियन व्हॅली लोणावळा आणि खंडाळा दरम्यान कुणे गावात आहे . जेव्हा तुम्ही मुंबई पुणे रस्त्यावर प्रवास करत असता , तेव्हा तुम्हाला कॅनियन व्हॅली बघायला भेटते . कॅनियन व्हॅली ही उल्हास नदीशेजारी आहे . कॅनियन व्हॅली ही एक दिवसाच्या ट्रेकर्स साठी पर्वणी मानली जाते .
१०. सुनील सेलेब्रिटी वॅक्स म्युझियम लोणावळा
FAQ :
१. लोणावळा ते पुणे किती अंतर आहे ?
लोणावळा पुण्यापासून ६४ किमी अंतरावर आहे . पुण्याहून लोणावळा येथे पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास वेळ लागतो .
2.पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन उपलब्ध आहे का?
होय . पुणे ते लोणावळा लोकल ट्रेन उपलब्ध आहेत . गाडी क्र. 01566 पुणे – लोणावळा लोकल ही प्रवाशांसाठी या मार्गावरील प्रमुख गाड्यांपैकी एक आहे . ती पुणे जंक्शन स्टेशनपासून सुरू होते आणि लोणावळ्याला संपते.
3. पुणे तळेगावची लोकलची वेळ किती आहे?
(99902) पुणे तळेगाव लोकल ट्रेन पुणे जंक्शन (PUNE) ते तळेगाव (TGN) दरम्यान धावते. 99902 पुणे तळेगाव लोकल ट्रेन पुणे जंक्शन 06:50 वाजता सुटते आणि तळेगाव स्टेशनवर 07:40 वाजता पोहोचते .
4. लोणावळा मधील प्रसिद्ध रिसॉर्ट्स कोणती आहेत ?
१.Meritas Adore रिसॉर्ट
3.रॅडिसन रिसॉर्ट आणि स्पा Radisson Resort & Spa Lonavala
4.पिकाडल, द लक्झरी बुटीक रिसॉर्ट
५.फर्न एक इकोटेल हॉटेल
६.ऑर्किड हॉटेल
7.लेक व्ह्यू रिसॉर्ट
८.डेला रिसॉर्ट्स आणि व्हिला