चिखलदरा chikhaldara

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा chikhaldara म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन आणि महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते . विशेषतः  पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे दऱ्याखोऱ्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात त्यामुळेच चिखलदरा हा पावसाळी पर्यटन स्थळ ( मान्सून डेस्टिनेशन ) म्हणून प्रसिद्ध पावला आहे. चिखलदरा हे सातपुड्याच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून 3664 फुट उंचीवर असलेल्या या ठिकाणाला “विदर्भाचे काश्मीर” म्हणून ओळखले जाते .थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे , ढगातून जाणारी वाट आणि कोसळणारे धबधबे पाहत प्रदेश पालथा घालायचा असेल तर सातपुड्याच्या या प्रदेशात यायलाच हवं. येथील निसर्ग नेहमी धुक्यात हरवलेला असतो आणि त्याला अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले नेहमी चिखलदराकडे वळत असतात. रिमझिम बरसणारा पाऊस आणि बोचरी थंडी यामुळे चिखलदरा चे वातावरण नेहमी आल्हाददायक असते.

chikhaldarachikhaldara

chikhaldara ला कसे जाल ?

१. बस

जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस तसेच खाजगी वाहने अमरावती तसेच नागपूर येथून उपलब्ध आहेत .अमरावतीपासून अंतर सुमारे ८५ किमी आहे . अमरावती मधून पोहोचण्यासाठी 2.५ तास वेळ लागतो . तसेच जवळील शहर हे परतवाडा , अचलपूर आहे . परतवाडा हून जाण्यासाठी बस , खाजगी वाहने उपलब्ध आहेत . परतवाडा ते चिखलदरा हे अंतर सुमारे ३0 किमी आहे . पोहोचण्यासाठी १ तास वेळ लागतो .

2. ट्रेन :

ट्रेन ने जर जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बडनेरा हे आहे . तिथे उतरून बस अथवा कार ने जाणे सोयीस्कर आहे . बडनेरा रेल्वे स्टेशन पासून अंतर १०० किमी आहे , त्यासाठी 3 तास वेळ लागतो .

3. जवळचे विमानतळ :

हवाई मार्गाने जायचे असेल तर नागपूर हे सर्वात जवळचे ठिकाण आहे . नागपूर येथील विमानतळावर उतरून तुम्ही बस अथवा कार ने या थंड ठिकाणी ला जाऊ शकता . नागपूर ते चिखल दरा हे अंतर २३० किमी आहे , त्यासाठी 3.५ तास वेळ लागतो .

chikhaldara

चिखलदरा chikhaldara चा इतिहास

निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या चिखलदऱ्याला रंजक असा इतिहास देखील लाभलेला आहे. चिखल दरा पासून जवळच विराट राज्याची राजधानी होती. तिला वैराग नगरी म्हणत असे. आजही वैराग गाव या ठिकाणी वसलेले आहे 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखल दऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे. त्यावेळी द्रौपदी सुद्धा वेश बदलून विराट राजाच्या महाराणी ची दासी म्हणून वास्तव्य करत होती. परंतु द्रौपदी वर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली, जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केले आणि त्याचा मृतदेह वैराट पासून दूर एका नदीच्या दरीत फेकून दिला त्यालाच ” किचक दरी ” म्हणून ओळखले जात होते कालांतराने अपभ्रंश होऊन त्याचे ” चिखलदरा ” असे नाव पडले. नंतर शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले त्यालाच ” भीमकुंड ” म्हणून ओळखले जाते.

chikhaldara प्रमुख पर्यटन ठिकाणे

१. पंचबोल पॉईंट

पंचबोल पॉईंट हे एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या पॉईंटचे वैशिष्टय म्हणजे या ठिकाणाहून आपण एक वेळेस आवाज दिला पाच वेळेस प्रतिध्वनी आवाज ऐकायला मिळतो म्हणूनच याला “पंचबोल पॉईंट” म्हणून ओळखले जाते. या पॉईंटकडे जाताना आपल्याला नागमोडी रस्ता आणि कॉफीचे मळे पाहायला मिळतात . चिखलदरा ते पंचबोल या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी कॉफीची लागवड इथे आपल्याला बघायला मिळते. या पॉईंटच्या एका बाजूला पाच टेकड्या आहेत ज्या एकत्र येऊन मधोमध खोल दरी बनवतात. चिखलदरा ते पंचबोल पॉईंट पाच किलोमीटर इतके आहे.

2. देवी पॉईंट

दरीच्या पायथ्याशी काही पायऱ्या उतरून गेले असता देवी पॉईंट आहे. डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे, कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मन मोहून टाकतो. नदी ज्या  बाजूने वाहते त्या खडकावर देवी मंदिराच्या उपस्थितीमुळे त्याला देवी पॉइंट म्हणून ओळखले जाते.

3. भीमकुंड

भीमकुंड हे चिखल दरा मधील नैसर्गिक जलस्त्रोत व पवित्र स्थान आहे . भीमकुंड चे पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक आहे कि पाण्यात मासे पोहताना स्पष्ट दिसतात . या तलावाला “नीलकुंड” असेही ओळखले जाते .महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वाढ करून या कुंडात हात धुतले अशी आख्यायिका आहे .

chikhaldara

4. गाविलगड

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. चिखलदऱ्याच्या दक्षिणेला तीन किलोमीटरवर बहामनी किल्ला आहे. किल्ला पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागतो. आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा वगैरे आहेत. इथली दुहेरी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याशिवाय इथले शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आणि मंकी पॉइंट अशी काही ठिकाणे प्रसिद्ध आहेत
गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. मूळचा गाविलगड किल्ला हा मातीचा होता. १२ व्या शतकात गवळी राजाने ( यादव) हा किल्ला बांधला होता. त्यावरूनच त्याला “गाविलगड” हे नाव पडले.

chikhaldara

किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.
मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत.

chikhaldara

५. मोझरी पॉईंट/ हरिकेन पॉइंट :

देवी पॉइंट आणि धबधब्यापासून जवळच मोझरी पॉईंट आहे. त्याच्या बाजूला लागून हरिकेन पॉईंट आहे. वन उद्यान येथे वनविभागाने वन उद्यान विकसित केले आहे. या उद्योगात मुलांसाठी गार्डन रेल्वेची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

६. मुक्तागिरी मंदिर

या थंड ठिकाणापासून पासून ४५ किमी अंतरावर मुक्तागिरी हे दिगंबर जैन समाजाचे एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय मंदिर आहे . नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक वातावरण यामुळे हे मंदिर खूप प्रसिध्द आहे . हे मंदिर उंच डोंगर टेकडीवर असल्याने भाविकांना साधारणपणे ३५० पायऱ्या चढून जावे लागते . मुक्तागिरी मंदिर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर स्थित आहे .

chikhaldara

chikhaldara

FAQ

१. चिखलदरा का प्रसिध्द आहे ?

हे प्रसिद्ध ठिकाण  विदर्भाचे नंदनवन आणि महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते . विशेषतः  पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे दऱ्याखोऱ्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात त्यामुळेच हे ठिकाण पावसाळी पर्यटन स्थळ ( मान्सून डेस्टिनेशन ) म्हणून प्रसिद्ध पावला आहे. सातपुड्याच्या कुशीतील थंड हवेचे ठिकाण आहे.

2. भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती ?

जुलै ते सप्टेंबर हा chikhaldara ला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे . हे ठिकाण  पावसाळी पर्यटन स्थळ ( मान्सून डेस्टिनेशन ) म्हणून प्रसिध्द असल्याने पावसाळा हा भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे .

3. नागपूर ते चिखलदरा हे अंतर nagpur to chikhaldara distance किती आहे ?

नागपूर ते चिखलदरा हे अंतर २३० किमी आहे , त्यासाठी 3.५ तास वेळ लागतो .

4. अमरावती  ते चिखलदरा हे अंतर amravati to chikhaldara distance किती आहे ?

अमरावती ते चिखलदरा हे अंतर सुमारे ८५ किमी आहे . अमरावती मधून पोहोचण्यासाठी 2.५ तास वेळ लागतो.

५. अकोला ते चिखलदरा हे अंतर akola to chikhaldara distance किती आहे ?

अकोला पासून अंतर सुमारे १२५ किमी आहे . पोहोचण्यासाठी 3.५ तास लागतात .

 

Leave a Comment