भंडारदरा bhandardara म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी असलेले सुंदर धबधबे , हिरवाई , लांब पसरलेल्या डोंगररांगा , धरण , रानफुले , काजवा महोत्सव आणि आदिवासी जीवनशैली चे अनोखे मिश्रण आहे . नाशिक मुंबई पासून सुट्टीसाठी निसर्ग पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय म्हणून पर्यटकांसाठी लाडके डेस्टिनेशन आहे .नाशिक पासून साधारणपणे ७० किमी अंतरावर आहे . प्रवरा नदीच्या काठी वसलेलं आहे. निसर्गाने मुक्त उधळण केली असून धबधबे डोंगरकडे , जलाशय , हिरवी झाडे , शुद्ध आणि थंड हवा यामुळे येथील सौंदर्य आणखी खुलले आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे धरण आणि रंधा धबधबा होय. पावसाळ्यात या भंडारदर्याचे एक अनोखी रूप पाहायला मिळते. निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल, पांढरेशुभ्र ढग पक्ष्यांचे विविध आवाज रंगीबेरंगी फुलपाखरे काजवे गर्द झाडी दाढ दुखी आपल्या मनाला मोहरून टाकते.
भंडारदरा Bhandardara येथे कसे जाल ?
१. बस ने :
भंडारदरा हे नाशिक पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक येथून जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. तसेच पुणे नगर औरंगाबाद आणि मुंबई येथून जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. तसेच नेवासा , श्रीरामपूर , लोणी , शेंडी येथून बस ने जाता येते .
2. ट्रेन ने :
मध्य रेल्वेचे इगतपुरी स्टेशन भंडारदरा पासून ४५ किमी अंतरावर आहे . तसेच जवळ अहमदनगर हे रेल्वे स्थानक आहे . जरी अहमदनगर जिल्ह्यात असले तरी अहमदनगर ते भंडारदरा हे अंतर सुमारे 150 किलोमीटर इतके आहे. हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे तीन तास लागतात.
3. स्वतः च्या वाहनाने :
भंडारदरा हे मुंबई नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या मध्यभागी वसलेले आहे. त्यामुळे जाताना स्वतःच्या वाहनाने गेल्यास इतरही निसर्गरम्य ठिकाणी पाहता येतात. मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर आहे. इतके अंतर पार करण्यासाठी साधारणपणे चार तास इतका वेळ लागतो. नाशिकहून 70 किलोमीटर अंतरावर आहे हे अंतर पार करण्यासाठी दीड तास वेळ लागतो.
भंडारदरा Bhandardara प्रमुख आकर्षणे :
१. रंधा धबधबा :
रंधा धबधबा हे भंडारदरातील मुख्य आकर्षण आहे. शेंडी या गावापासून 10 किमी अंतरावर प्रवरा नदीच्या वर रंधा येथे हा धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय धारण करतो . पावसाळ्यात मुख्य धबधब्या सोबत अजून एक धबधबा उजव्या बाजूने प्रवाहित होतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचक अनुभव आहे. पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पावसाळ्यात होत असते.
2.भंडारदरा धरण :
भंडारदरा धरण हे आशिया खंडातील एक जुना धरण आहे या धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून जलाशयास आर्थर लेख असे म्हटले जाते हे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे 1926 साली बांधलेलं धरण हे एक सुंदर आणि निसर्गरम्य धरण आहे. प्रवरा नदीला या परिसरात अमृतवाहिनी असे संबोधले जाते या नदीचा उगम रतनगडावर झाला आहे. धरणात बोटिंग करत रतनवाडी येथे जाता येते.
3.अम्ब्रेला फॉल
पावसाळ्यामध्ये धरण जेव्हा पूर्ण भरतो तेव्हा धरणाचे दरवाजे उघडले जातात तेव्हा धरणाच्या भिंतीवरून पडणाऱ्या पाण्यामुळे छत्रीच्या आकाराचा धबधबा निर्माण होतो त्याला “अम्ब्रेला फॉल” या नावाने ओळखले जाते. हा धबधबा जुलै जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाहता येतो.
4. कळसुबाई डोंगर :
भंडारदऱ्याच्या जवळच महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे कळसुबाई शिखर आहे. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मी इतकी आहे. सह्याद्रीच्या या उंच शिखरावर कळसुबाई चे मंदिर आहे. पावसाळ्यात संपूर्ण कळसुबाई शिखर धुक्यात लपेटली असते. कळसुबाई वरून संपूर्ण परिसराची दिसणारे चित्र नयनरम्य व मनमोहक असते. शिवाय या परिसरात अनेक वन्यप्राणी व पक्षी आढळतात .
५. सांदण व्हॅली:
सांदण व्हॅली ही डोंगर कपारी मध्ये निर्माण झालेली आहे. सांदण व्हॅली येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक मार्ग हा शेंडी या गावातून भाटघर मार्गे जातो. तर दुसरा मार्ग रतनवाडी मार्गे चांदन वेली येथे जाता येते. सांदण व्हॅली येथे जाताना सोबत वाटाड्या घेऊन जाणे आवश्यक आहे. व्हॅलीत उतरत असताना अरुंद वाट आहे. येथील निसर्गरम्य परिसर, कोसळणारा पाऊस , अनेक कोसळणारे धबधबे आणि भरपूर धुके यामुळे पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे.
धरण येथून रतनवाडी येथे जाण्यासाठी बोटिंग चा पर्याय उपलब्ध आहे. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन मंदिर पाहण्याजोगे आहे . मंदिरातील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून मुख्य गाभार्यात शिवलिंग आहे. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून नेकलेस फॉल हा प्रसिद्ध धबधबा येथे आहे.
FAQ
१. भंडारदरा का प्रसिद्ध आहे ?
सुंदर धबधबे , धरण , रानफुले , डोंगर रांगा तसेच सांदण व्हॅली , कळसुबाई शिखर या ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे.
2. भंडारदरा धरणाचे नाव काय आहे ?
धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून जलाशयास आर्थर लेख असे म्हटले जाते हे धरण प्रवरा नदीवर बांधलेले आहे 1926 साली बांधलेलं धरण हे एक सुंदर आणि निसर्गरम्य धरण आहे.
3. भंडारदरा ला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?
हे प्रसिध्द ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे . त्यामुळे तुम्ही जरी वर्षभर भेट दिली तरी येथील ठिकाणे पाहता येतात . मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर ते डिसेम्बर हा सर्वोत्तम काळ मानला जातो .