भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेण्या म्हणजेच अजिंठा लेणी ajintha leni होय. अजिंठा लेणी यांना प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची बौद्ध धर्माच्या वारसा सांगणारी पार्श्वभूमी लाभलेली आहे. तसेच अजिंठा लेणी ही “वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थान” म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये घोषित केली आहे तसेच जून 2013 मध्ये ” महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची” जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा अजिंठा हे महाराष्ट्रातील प्रमुख आश्चर्य घोषित करण्यात आली आहे. सुवर्णयुगाचा वारसा सांगणाऱ्या अजिंठा वेरूळच्या लेण्या म्हणजेच महाराष्ट्राचे गौरवस्थान होय. पाषाणातून कोरलेल्या या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. कित्येक शतकांपूर्वी भारतीय कारागिरांनी मिळवलेले कौशल्य आणि त्यांना लाभलेली सौंदर्यदृष्टी त्यातून पर्यटकांना दिसत असते. भारतीय कला आणि इतिहास या विषयी अधिकाधिक माहिती जाणून घेणाऱ्यांसाठी अजिंठा हे आकर्षण केंद्र बनले आहे आणि त्यामुळेच जागतिक स्तरावर अजिंठा हे प्रमुख पर्यटन स्थळ बनलेले आहे.
अजिंठा लेणी ajintha leni ला कसे जाल ?
अजिंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात स्थित आहेत . जरी लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात असल्या तरी त्यांचे जिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर सुमारे १०५ किमी इतके आहे .
१. बस :
अजिंठा लेणी येथे पोहोचण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून बसेस उपलब्ध आहेत .छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ते अजिंठा लेणी हे अंतर सुमारे १०५ किमी असून त्यासाठी 2.५ तास वेळ लागतो . याशिवाय जळगाव पासून अजिंठा लेणी ह्या ६० किमी अंतरावर आहेत . जळगाव ते अजिंठा लेणी बसेस उपलब्ध असून या प्रवासासाठी १.५ तास वेळ लागतो . मुंबई तसेच पुणे हून अजिंठा लेणी येथे यावयाचे असेल तर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे सर्वात सोयीचे ठिकाण आहे .
2. ट्रेन :
जर तुम्ही अजिंठा लेणी येथे ट्रेन ने जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे जळगाव आहे . जळगाव रेल्वे स्टेशन हे लेणी पासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे . मुंबई , नवी दिल्ली , बुऱ्हानपूर , ग्वाल्हेर , सतना , वाराणसी , अलाहाबाद . पुणे , बेंगलोर , गोवा यासह सर्व प्रमुख ठिकाणपासून जळगाव स्थानकासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहेत . जळगाव रेल्वे स्थानकातून तुम्ही बस अथवा खाजगी प्रवासी वाहनाने अजिंठा येथे पोहोचू शकता .याशिवाय छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे रेल्वे स्टेशन अजिंठा पासून ११० किमी अंतरावर आहे.
3. विमानाने :
लेणी पासून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हे सर्वात जवळचे विमानतळ आहे .येथून लेणी ह्या ११० किमी अंतरावर आहेत , जिथे पोहोचण्यासाठी 3 तास वेळ लागतो . देशातील प्रमुख ठिकाणाहून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे विमान व्यवस्था उपलब्ध आहे . दिल्ली व मुंबई सारख्या प्रमुख शहरातून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ला थेट विमानसेवा उपलब्ध आहे . लेण्यांमध्ये जाण्यासाठी तुम्ही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळावरून कोणतीही बस किंवा कॅब करू शकता .
अजिंठा लेण्याचा ajintha leni इतिहास
अजिंठा लेण्यांचा शोध इसवी सन 1819 मध्ये ब्रिटिश भारताच्या मद्रास भागातील अधिकारी जॉन स्मिथ याने लावला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही दिसून येते. प्राचीन भारतात धर्मशाळा , लेण्या , विहार मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभा करण्यात येत असत. त्यांचा मुख्य उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असे. अजिंठा येथील लेण्यांची निर्मिती देखील याच उद्देशाने झाली असावी असे मानले जाते.
उपलब्ध पुराव्यानुसार लेणी ही वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली असे मानले जाते. अजिंठा येथे एकूण 29 लेण्या आहेत. त्यापैकी ९ , १० , १२ , १३ , १५ या लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत म्हणजेच इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास कोरले गेले असावेत. या व्यतिरिक्त 1 ते 29 क्रमांकाच्या लेणी साधारणपणे इसवी सनाच्या सहाव्या ते सातव्या शतकाच्या दरम्यान महायान कालखंडात निर्माण केल्या गेले असावेत. महायान लेणी वाकाटक राज्यांच्या राजवटीत निर्माण केल्या गेल्याने त्यांना अनेकदा ” वाकाटक लेणी” असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या अस्तानंतर अजिंठा लेण्यांची निर्मिती अचानक थांबली.
रॉबर्ट गिल कोण आहेत ?
रॉबर्ट गिल हा ब्रिटीश भारतातील एक सैन्य अधिकारी होता . तसेच तो चित्रकार व छायाचित्रकार होता . अजिंठा येथील येथील चित्रांचे महत्व लक्षात घेऊन ब्रिटीश सरकारने त्याची नेमणूक अजिंठा येथे चित्रांची प्रतिकृती करणेसाठी केली . रोबर्ट गिल अजिंठा येथे आल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली . पारोने रॉबर्ट गिल ला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी मदत केली . यातूनच पुढे गिल पारोची प्रसिद्ध प्रेमकथा समोर आली . यावर ना धो महानोर यांनी “अजिंठा ” या खंडकाव्यात वर्णन केले आहे तसेच यावर नितीन देसाई यांनी ” अजिंठा ” या मराठी चित्रपट प्रसिध्द केला .रॉबर्ट गिल याने पारो च्या निधनानंतर तिची कबर बांधली आणि त्यावर ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी लिहिल्या आहेत.
अजिंठा लेणी पाहण्याची वेळ
पर्यटकांना सोमवार वगळता इतर दिवशी लेणी पाहण्यासाठी खुली असते . सोमवारी कोणत्याही पर्यटकांना लेणी खुली नसते . लेणी मंगळवार ते रविवार , सकाळी ९ पासून सायंकाळी ५ पर्यंत खुली असते . सायंकाळी ५ नंतर पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही.
अजिंठा लेणीची वैशिष्ट्ये
लेण्यांची निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे या लेण्यांची निर्मिती केलेली आहे तसेच लेण्यांमधील भिंती आणि छतांवर विविध चित्रे काढलेली आहेत ज्यामध्ये भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग यांचे चित्रण केले आहे. जेव्हा पर्यटक लेण्यांना भेट देतात तेव्हा गुहांच्या काळोखात इतकी रूप चित्रे आणि बारकाई चे कोरीव काम करणे तत्कालीन कारागिरांना कसे साध्य झाले असावे असा प्रश्न पडतो. दिवसातील काही ठराविक वेळात या गुहा नैसर्गिक सूर्यप्रकाशात जुळून निघतात तेव्हा या लेणी पाण्यासारख्या लाजवाब असतात. इथल्या काही गुंफा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 26 क्रमांकाच्या गुंफेत मोठमोठ्या सुंदर मूर्ती आहेत पण त्यातील रंगीत भिंती चित्रे अपूर्ण आहेत. 19 व्या क्रमांकाच्या गुंफेच्या एका टोकाला उभी बुद्ध मूर्ती आहे 16 क्रमांकाची गुंफा हे एक मोठे विहार आहे उपदेश करण्यात मग्न असलेली विशाल बुद्धमूर्ती येथे पाहता येते. गुंफा क्रमांक १ , 2. 16 आणि १७ क्रमांकाच्या गुंफा मधील भिंती चित्रांना कोणती हानी न पोचल्याने तेथील चित्र सुस्पष्ट व सजीव वाटतात.
पहिल्या क्रमांकाच्या गुंफेत असलेले विख्यात बोधीसत्व पद्मपाणी म्हणजेच कोमल दयेचे अद्भुत रेखाचित्र आहे येथील सुंदर मूर्तीच्या नाजूक हातात कमळ पुष्प दिसते 17 व्या क्रमांकाच्या गुंफेत आकाशात विहार करणारे अप्सरा असून तिच्या पोशाखावर नाजूक कलाकुसर आणि अंगावर अनेक दागिने दिसतात. या गुहांमधील काही अंतर चालून गेल्यावर घोड्याच्या नालाच्या आकारात एक खिंड दिसते येथेच नाविन्यपूर्ण जलव्यवस्था केली आहे त्यातून भिक्षूंना आणि त्यांच्या अनुयायांना पाणीपुरवठा होत असावा.
लेण्यांना भेट देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान अजिंठा येथील वातावरण थंड व प्रसन्न असल्याने अजिंठा लेण्यांना भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काल असतो . उन्हाळ्यामध्ये येथे तापमान ४० डिग्री पेक्षा अधिक जात असल्याने उन्हाळ्यात भेट देणे टाळावे .
लेणी प्रवेश शुल्क व चार्जेस ticket price
अजिंठा लेणी येथे भेट देण्यासाठी येणाऱ्या भारतीयांना १० रुपये प्रवेश शुल्क तर परदेशी लोकांना २५० रुपये शुल्क भरावे लागते . १५ वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश विनामूल्य आहे .
FAQ
१. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अजिंठा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात स्थित आहेत .
2. अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला ?
अजिंठा लेण्यांचा शोध इसवी सन 1819 मध्ये ब्रिटिश भारताच्या मद्रास भागातील अधिकारी जॉन स्मिथ याने लावला.
3. अजिंठा लेणी कधी बंद असते ?
अजिंठा लेणी प्रत्येक सोमवारी बंद असते .