सवतकडा धबधबा Savatakda Waterfalls

  कोकणातील अनेक अशी ठिकाणं आहेत जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पर्यटकांना खुणावत असतात.सवतकडा धबधबा हे राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण मधीलही एक असेच ठिकाण आहे. येथे सध्या प्रचंड गर्दी होताना दिसत असून पर्यटक येथे गर्दी करत आहेत. कोकणात सध्या दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे येथील नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. तर पर्यटकांना खुनावणारे अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक चर्चिला जाणारा धबधबा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सवतकडा धबधबा Savatakda Waterfalls . हा धबधबा राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण या अत्यंत  सुंदर गावात आहे . या गावामधील सुतारवाडी येथे असणाऱ्या सवतकडा धबधब्याला पावसात खूप गर्दी होत असते. आणि याचं आकर्षण म्हणजे उंच कड्यावरून ओसांडून वाहणारा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जून पासून ते अगदी गणपती, दिवाळीपर्यंत पर्यटकांची गर्दी असते.

सवतकडा धबधबा Savatakda Waterfalls

सवतकडा धबधबा Savatakda Waterfalls

जाण्याचे मार्ग

१ . स्वतःच्या गाडीने येत असाल तर रत्नागिरी शहरापासून सवतकडा धबधबा ६० किमी अंतरावर आहे . त्यासाठी रत्नागिरी मधून मुंबई गोवा महामार्गावरून ओणी शहरापासून आतमध्ये १९ किमी अंतरावर चुना कोळवण गाव आहे . तिथून धबधब्याकडे जाणारी वाट आहे. कच्चे रस्ते, पावसाळ्यात वाहणारे छोटे मोठे झरे हे सर्व अडथळे पार करत अनेक पर्यटक या धबधब्याला दरवर्षी भेट देत असतात.

२. रेल्वेने by train

रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ उतरलात तर  रेल्वेस्टेशन पासून सवतकडा हे ठिकाण  ५६ -५८  किलोमीटर अंतरावर आहे. तिथून तुम्ही बसने किंवा स्वतःच्या वाहनाने  येऊ शकता.

तुम्ही राजापूर रेल्वे स्टेशन जवळ उतरलात तर तेथून सवतकडा येथील अंतर हे फक्त २६-३०  किलोमीटर आहे. पण या रेल्वे स्टेशनला एक्स्प्रेस या गाड्या थांबत नाहीत, त्यामुळे तुम्ही रत्नागिरी रेल्वेस्टेशनला उतरला तर बरं होईल. रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या बाहेर आलाच तर हायवेला एसटी महामंडळाच्या बसेस येत असतात.

प्रमुख आकर्षण

मित्रांनो सवतकडा हा धबधबा जवळपास 100 मीटरपेक्षा जास्त उंचीचा असून, या धबधब्याच्या पायथ्याशी गेल असता नजर वर करून सुद्धा पाहता येत नाही, याचे कारण म्हणजे उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे त्या पाण्याचे रुपांतर हे छोट्या छोट्या बिंदूंमध्ये होते आणि ते बिंदू वाऱ्याच्या प्रवाहाने  डोळ्यावरती येत असतात हे पाहून खूप सुंदर वाटते.

सवतकडा धबधबा स्थळावर गेल्यावर थोडीफार जंगलातून वाट काढावी लागते. नंतर मग समोर दृश्य दिसते ते उंचावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी. ते  उंचावरून कोसळणारे पाणी बघत, आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्य बघत तसेच त्या पाण्यात डुंबत येथे वेळ कधी जातो  ते काही कळत नाही. उंचावरून कोसळणारे पाणी अंगावर घेत.  आपल्यात असलेल्या अनेक टेन्शन,  थकवा कसा चुटकीसरशी निघून जातो. या पावसाळ्यात या पर्यटनाला  भेट देत असाल तर थोडीफार काळजी घेऊन तिथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधून तुम्ही या फेसाळणाऱ्या धबधब्याच्या आनंद लुटू शकता.

जवळील हॉटेल्स

१. शेरलीन मोन्टा रिसोर्ट Cherilyn Monta Resort  –

जर तुम्हाला जवळ राहावयाचे असेल व निसर्गाचा आस्वाद घ्यावयाचा असेल तर हे हॉटेल तुमच्यासाठी आहे . सवतकडा धबधबा पासून हे हॉटेल केवळ १२ किमी अंतरावर आहे , येथील जेवण व राहण्याची व्यवस्था अप्रतिम आहे .

२ जर तुम्हाला अगदीच भूक लागली तर तिथे पोटपूजा करण्यासाठी छोट्या टपर्या मिळून जातील म्हणजेच वडापावची हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही वडापाव किंवा चायनीज भेल  अशी स्नॅक्स घेऊन तुम्ही तुमची भूक भागवू शकता. जर तुम्हाला बाहेरचं खायला आवडत नसेल तर तुम्ही तुमचं जेवण किंवा तुमचे खाण्याचे पदार्थ तुम्ही ते सोबतच आणलेले चांगले . फक्त धबधबा ठिकाणी कचरा करू नका .

FAQ

१.सवतकडा धबधबा कुठे आहे?

सवतकडा धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गालगत  आहे .

2. सवतकडा धबधबा येथे जाताना काय काळजी घ्यावी ?

  धबधबा च्या वरील भागात  तीव्र उतार भाग असल्याने पाऊस पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये पाणी वाहत येते. याबाबत स्थानिक लोकांना माहिती असते. अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांना फारशी माहिती नसते. काही  वर्षापूर्वी मुसळधार पावसामध्ये अचानक वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत . सवतकडा धबधब्याच्या येथील भौगोलिक स्थितीसह पर्यटनस्थळाची माहिती आणि सुरक्षेच्यादृष्टीने सूचना देणारे फलक लावले आहेत.

तसेच पर्यटकांच्या संख्येमध्ये दरवर्षी अधिकच वाढ होत चालली आहे.मात्र निसर्ग परिसर आणि लोकवस्तीपासून काहीशा दूर असलेल्या या धबधब्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून मद्यपान केले जात असल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास त्या ठिकाणी कुटुंबीयांसमवेत आलेल्या महिला, तरुणी, लहान मुलांना होतो. त्याच्यातून त्या ठिकाणचे वातावरणही बिघडते. काही दिवसांपासून धबधबा परिसरामध्ये मद्यपान करून वातावरण बिघडवणाऱ्या पर्यटकांना चुनाकोळवण येथील श्री अंबिकेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा दिला आहे , तरी कृपया धबधबा परिसरात मद्यपान कोणीही करू नये व धबधब्याचा आनंद घ्यावा .

2 thoughts on “सवतकडा धबधबा Savatakda Waterfalls”

Leave a Comment