सांगली मिरज शहराजवळ पाहण्यासारखे आहे तरी काय , असा प्रश्न पडल्यास नेहमी डोळ्यासमोर येते ते प्रेक्षणीय व आल्हाददायक ठिकाण म्हणजे दंडोबा डोंगर Dandoba Hill. मिरज व कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर दंडोबा डोंगर पर्यटकांना नेहमीच खुणावत आहे . सांगली जिल्ह्यात एक दिवसाचा पिकनिक स्पॉट म्हणून दंडोबा डोंगराची ओळख सर्वत्र झाली आहे . या ठिकाणी डोंगरावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर चालूच असते . ट्रेकिंग पर्यटनासाठी सर्वाना भुरळ घालणारा दंडोबा डोंगर पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे .
सुमारे ११५० हेक्टरवर विस्तीर्ण पसरलेल्या डोंगरावर अनेक औषधी वनस्पतीसह विविध प्रकारचे प्राणी आढळतात . डोंगरावर दंडनाथ मंदिर आहे , जे परिसरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे . दंडोबा डोंगरावर जाण्यासाठी पूर्णतः पक्का रस्ता आहे . ऐतिहासिक म्हणून असलेल्या डोंगरावर सुमारे दोनशे वर्षाहून अधिक काळ असलेले शिखर ही दंडोबाची ओळख आहे . पाच गावांच्या हद्दीत दंडनाथाचे मंदिर हे या डोंगराचे मुख्य वैशिष्टय आहे .
दंडोबा डोंगर Dandoba Hill
दंडोबा डोंगर dandoba hill कसे जाल ?
१ .दंडोबा डोंगर Dandoba Hill हे सांगली शहरापासून ४० किमी अंतरावर आहे , सांगली हून दंडोबा डोंगर येथे पोहोचायला १ तास लागतो . यासाठी सांगलीहून आपल्याला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते .
सांगली ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर – ४० किमी
मिरज ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर – ३० किमी
कवठे महांकाळ ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर – १८ किमी
2. ज्यांना ट्रेकिंग करीत डोंगरावर जायचे असेल त्यांना खरशिंग तसेच सिद्धेवाडी मार्गे ट्रेकिंग करीत जाता येते . डोंगर चढण्यासाठी सुमारे १ ते दीड तास लागतो
3. ज्यांना ट्रेन ने दंडोबा डोंगर पर्यंत पोहोचायचे असेल त्यांना जवळील रेल्वे स्थानक सांगली तसेच मिरज आहे . सांगली तसेच मिरज हून दंडोबा येथे जाण्यासाठी बस तसेच खाजगी प्रवासी वाहने उपलब्ध आहेत .
दंडोबा डोंगर dandoba hill इतिहास
प्रसिद्ध इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर हे दंडोबाचा इतिहास सांगताना म्हणतात की , दंडोबा म्हणजे दंडनाथाचे मंदिर आहे . इथे काही लेणी आहेत . त्या इसवी सन सातव्या आठव्या शतकात खोदल्या असाव्यात . ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सन १८८० च्या सुमारास या लेण्यांबाबत उल्लेख करून ठेवलेले आहेत . त्यांनी इथे वारंवार भेटी दिल्या . इथे काही मूर्ती आहेत . दहाव्या अकराव्या शतकातील महिषासुरमर्दीनीची मूर्ती आहे. भैरवाची मूर्ती आहे . याशिवाय दोन अस्पष्ट शिलालेख आहेत . ते यादव काळातील असावेत .
या मंदिरावर सांगली चे पटवर्धन संस्थानिकांची भक्ती होती . श्रावण सोमवारी कुटुंबासह ते दंडोबाला भेट देत . इथे हत्तीवाट आहे म्हणजे त्या काळी इथे हत्ती आणले जात असावेत . व्यापारी येथे मुक्काम करीत असत , असे काही ठिकाणी उल्लेख आहे . ही सर्व शैव पंथीयांची लेणी आहेत . लोकांचा वावर कमी झाल्याने या परिसराला अवकळा आली .
दंडोबा डोंगर dandoba hill येथील प्रमुख आकर्षण
१. दंडनाथाचे मंदिर :
दंडोबा डोंगरावर प्राचीन दंडनाथाचे मंदिर आहे . मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी गुफा आहे . श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते . मुख्य मंदिरासमोर सभामंडप आहे , त्याच्या नजीक सभागृह तसेच वन विभागाची कुटी आहे . डोंगरावर केदारलिंग मंदिरासह अनेक मंदिरे आहेत . हा परिसर शांत असल्याने व चांगला एकांत मिळत असल्याने येथे ध्यान धारणेसाठी अनेकजण येतात .
2.दंडोबा डोंगर dandoba hill ट्रेकिंगची पर्वणी :
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत दंडोबा डोंगरावर हिरवाई पसरलेली असते . त्यामुळे या कालावधीत पर्यटकांचा ओघ असतो . याच कालावधीत दंडनाथाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली असते . श्रावणात पर्यटक तसेच भाविकांची गर्दी असते मात्र एरवी ट्रेकिंग साठी गर्दी खूप असते . दंडोबा डोंगरावर जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता असला तरी दंडोबा डोंगर चढण्यासाठी ट्रेकिंगचा अनुभव घेता येतो. डोंगरावर चढण्यासाठी चारही बाजूने ट्रेकिंगची सुविधा असली तरी भोसे कडील बाजूने पायथ्याकडून पर्यटक या भागाकडे येतात .
दंडोबा वरील टेहळणी बुरुज आणि तिथून झोंबणारा गार वारा आणि दिसणारे विहंगम दृश्य विलोभनीय असेच आहे. अनेक लोक पायथ्याला वाहने लावून डोंगर चढायला जातात . सरासरी एक ते दीड तासात डोंगरावरील गुहा , मंदिरापर्यंत पोहोचता येते . मार्गात काही ठिकाणी घनदाट झाडी आहे . हंगामात करवंदाच्या जाळ्या सर्वाना खुणावतात . झऱ्यातून वाहणारे थंडगार पाणी लोकांना प्रफुल्लीत करते . अनेक लोक पहाटे पायथ्याला पोहोचतात आणि सकाळच्या मोकळ्या हवेचा व सूर्योदयाचा आनंद घेतात .
3. एक दिवसाचा पिकनिक स्पॉट:
श्रावण महिन्यात डोंगरावर हिरवाई पसरते . वातावरणातील गारवा , रिमझिम पाऊस व हिरवाई मुळे दंडोबा डोंगरावर वर्षा पर्यटनासाठी लोक कुटुंबासह सहलीला येतात , युवकही गर्दी करतात . हा डोंगर एक दिवसाचा पिकनिक स्पॉट बनत आहे .
4. विपुल वनसंपदा व प्राण्यांचे वास्तव्य :
सुमारे ११५० हेक्टरवर विस्तीर्ण पसरलेल्या डोंगरावर अनेक औषधी वनस्पतीसह विविध प्रकारचे प्राणी आढळतात . दंडोबा डोंगराचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने येथे अनेक प्रकारचे प्राणी आढळतात . ज्यात प्रामुख्याने लांडगे , तरस , सापांच्या विविध जाती , मोर व विविध पक्षी पहावयास मिळतात . अभ्यासकांसाठी हा दंडोबा डोंगर एक पर्वणीच ठरत आहे .
FAQ
१. सांगली ते दंडोबा डोंगर dandoba hill अंतर किती आहे ?
दंडोबा डोंगर Dandoba Hill हे सांगली शहरापासून ४० किमी अंतरावर आहे , सांगली हून दंडोबा डोंगर येथे पोहोचायला १ तास लागतो . यासाठी सांगलीहून आपल्याला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते .
2 . दंडोबा डोंगर dandoba hill जवळ राहण्यासाठी कोणते रिसोर्ट आहे का ?
दंडोबा डोंगराच्या पायथ्याला रॉयल विला रिसोर्ट आहे . ज्या ठिकाणी जेवणाची व राहण्याची खूप चांगली सोय आहे .